रविवार कारंजासह मुख्य चौकात सीसीटीव्हीचा वॉच

 

प्रभाग तेरासाठी शासनाकडून एक कोटींचा निधी
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये सीसीटीव्ही वॉच असणार आहे. रविवार कारंजासह प्रभाग क्रमांक तेरामधील मुख्य बाजारपेठेसह चौक परिसरात यापुढे महत्वाच्या परिसरावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. आरके सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व स्व.सुरेखाताइ भोसले सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सचिन भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रभागातील विकासकामांकरिता निधीची मागणी केली होती. ही मागणी तात्काळ मान्य करत शासकीय निधीतून प्रभागात तब्बल एक कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

 हेही वाचा :    मनपा शिक्षण अधिकारी लाच घेताना जाळ्यात

महापालिकेत प्रशासकराजवट असल्याने शहरातील विकासकामे खोळ्ंबली आहेत. दरम्यान प्रभागातील विकास कामे व्हावीत याकरिता भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे विकास निधीची मागणी केली होती. राज्यातील महानगरपालिकांना मुलभुत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येते. विशेषत: या निधीचा खर्च संपूर्ण खर्च राज्य शासन करेल. त्यामुळे सदर प्रकल्पाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत सक्षम प्राधिका-यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असल्याची खातरजमा जिल्हाधिकारी यांनी करून घ्यावी. त्यानंतर जिल्हाधिकारी कामास प्रशासकीय मान्यता देतात. यानुसारच प्रभाग तेरा मध्ये एक कोटीचा निधी मंजुर केला आहे. प्रभागातीअ चौकाचौकांमध्ये येत्या काही दिवसात सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. 80 लाख सीसीटीव्ही तर 20 लाखाचे बेंचेस प्रभागात बसवले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असता त्यास तात्काळ मंजुरी दिल्याने सचिन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

प्रभाग तेरामध्ये जे महत्वाचे विषय आहेत. ते मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांच्या मदतीने प्रयत्न आहेत. रहिवाशी व व्यापारी वर्गास मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरवठा करणार आहोत. यासह भविष्यात चाळीस वर्ष झालेल्या होळ्कर पूलाची डागडुजी करुन सुशोभीकरनाची मागणी आहे. तसेच भद्रकाली परिसर, दहिपूल, भद्रकाली पटांगण, गाडगे महाराज आश्रम या परिसरातही सीसीटीव्हीसाठी कार्यन्वयीत करणे अत्यावश्यक असल्याने यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी प्रस्ताव देणार आहोत.
सचिन भोसले. (अध्यक्ष स्व. सुरेखाताइ भोसले सामाजिक प्रतिष्ठान)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *