मराठा समाज आरक्षणाच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत
नाशिक : मराठा समाज आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील विविध भागांत या विजयाचा गुलाल उधळत मराठा समाज बांधवांनी आनंदोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. नाशिकमधील समाजबांधवांनी ग्रामदैवत कालिकामातेची आरती करून पेढे वाटले. फटाक्यांच्या रोषणाईत सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शैक्षणिक व नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याकारणाने राज्य सरकारचे कौतुक केले. मराठा समाजाने अभिनंदनाचा ठराव यावेळी ठेवत तो सर्वांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आला.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व समितीत असलेल्या सर्व मंत्रिमहोदयांंनी घेतलेले निर्णय हे समाजाच्या अपेक्षांनुसार आणि संघर्षाला न्याय देणारे ठरले आहेत. मराठा समाजबांधव आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या व मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याने जिल्ह्यातील सर्व स्तरांतील मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिलेल्या सर्व आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत.आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काला गती देण्यात येणार आहे.
शहरासह जिल्ह्यातील गावागावांत बुधवारी (दि. 3) सकल मराठा समाज एकत्र जमला होता. नाशिक शहरातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी नाशिकच्या ग्रामदैवत कालिका मातेची आरती करत फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना मिठाई वाटली. सर्वत्र जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी वातावरण दुमदुमले.
सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले. यावेळी हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर, केशवअण्णा पाटील, नितीन सुगंधी, राजू देसले, आशिष हिरे, प्रफुल वाघ, डॉ. रूपेश नाठे, राम खुर्दळ, योगेश गांगुर्डे, प्रवीण पाटील, भारत पिंगळे, योगेश कापसे, राम पाटील, विकी गायधनी, नितीन काळे, राजेंद्र शेळके, नितीन खैरनार, अनिल आहेर, संदीप हांडगे, ममता शिंदे, रेखा जाधव, रागिणी आहेर, रोहिणी उखाडे, अमोल शिंदे, किरण पानकर, महेंद्र बेहरे, ज्ञानेश्वर कवडे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सारथी शिक्षणसंस्था, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी सातत्याने प्रयत्न करून त्या माध्यमातून मराठा समाजातील अनेक मुलांना नोकरीत व व्यवसायात पुढे आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याच पद्धतीने आता मंजूर केलेल्या मागण्यासुद्धा कायमस्वरूपी टिकवून मराठा समाजाला न्याय देतील, अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. सरकारचे अभिनंदन करतो. तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठीसुद्धा सरकारने योग्य ते प्रयत्न करून न्याय द्यावा.
– करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…