मध्य रेल्वेद्वारा राजधानी एक्स्प्रेसचा सातवा वर्धापन दिन उत्साहात

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या सातव्या वर्धापन दिनाचा उत्सव आपल्या प्रवासी, रेल्वेप्रेमी, कर्मचारी, कोचिंग डेपो कर्मचारी तसेच मध्य रेल्वेच्या इतर कर्मचार्‍यांसह साजरा केला.
मध्य रेल्वेची 22221/22222 राजधानी एक्स्प्रेस 19 जानेवारी 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीनदरम्यान सुरू करण्यात आली. सुरुवातीला या गाडीत एक प्रथम वातानुकूलित श्रेणी, तीन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, आठ वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि एक पॅन्ट्री कार होती. या गाडीला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने सुरुवातीनंतर अवघ्या एका महिन्याच्या आतच गाडीत एक प्रथम वातानुकूलित श्रेणी, पाच वातानुकूलित द्वितीय श्रेणी, बारा वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि एक पॅन्ट्री कार अशी वाढ करण्यात आली.
सुरुवातीला ही गाडी आठवड्यातून दोन वेळा चालवण्यात येत होती. त्यानंतर 13 सप्टेंबर 2019 पासून ही सेवा आठवड्यातून चार वेळा करण्यात आली. दुसर्‍या वर्धापन दिनापासून म्हणजेच 19 जानेवारी 2021 पासून या गाडीची सेवा दररोज सुरू करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला मिशन रफ्तार साकारत पुशपुल तंत्रज्ञानावर धावणारी भारतातील पहिली गाडी होण्याचा मान मिळाला आहे. यामुळे आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. पुशपुल पद्धतीत गाडीच्या पुढील बाजूस एक इंजिन आणि मागील बाजूस एक इंजिन असते. यामुळे घाट विभागात बँकर इंजिन जोडण्याची किंवा वेगळे करण्याची गरज भासत नाही. मौल्यवान वेळेची बचत होते आणि परिणामी प्रवासाचा वेळ कमी होतो.
सध्या ही गाडी दररोज 16.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटते आणि दुसर्‍या दिवशी 09.55 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचते. या प्रवासादरम्यान गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, भोपाळ, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर आणि आग्रा कॅन्ट या स्थानकांवर थांबते.
परतीच्या प्रवासात ही गाडी दररोज 16.55 वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटते आणि दुसर्‍या दिवशी 11.15 वाजता छत्रपती शिवाजी
या सेवेचा मुंबई व उपनगरीय परिसरातील प्रवाशांसह नाशिक, जळगाव आणि भुसावळ विभागातील प्रवाशांना मोठा लाभ झाला असून, राष्ट्रीय राजधानीशी अधिक जलद आणि सुलभ संपर्क उपलब्ध झाला आहे. ही प्रतिष्ठित राजधानी एक्स्प्रेस भारतीय रेल्वेच्या प्रगतीचे प्रतीक आहे. प्रवाशांना वेग, आराम आणि विश्वासार्हता प्रदान करत कार्यक्षम संचालनात नवे मापदंड प्रस्थापित करते.

Central Railway celebrates the seventh anniversary of Rajdhani Express with enthusiasm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *