नाशिक:प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा होती, आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले, जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाले, या इमारतीचे उदघाटन त्यांच्या कारकिर्दीत होण्याची अपेक्षा असतानाच त्यांची बदली करण्यात आली. सुपर50, सी एसआर फंडातून बस दिव्यांगासठी अनेक उपक्रम राबवले, कर्मचाऱ्यांच्य बदल्यांचे प्रकरण त्यांच्या कारकिर्दीत चांगलेच गाजले होते.