नाशिक: नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी हेमंत गोडसे यांनाच मिळेल, हे जवळपास निश्चित झाले आहे, उमेदवारी च्या स्पर्धेतून आपण माघार घेत असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत असून आपल्याला वरिष्ठ भाजप नेत्यांनी शब्द पण दिला होता, पण गेल्या काही दिवसापासून महायुती त उमेदवारी वरून जे काही सुरू होते ते पाहता आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे भुजबळ म्हणाले,