चैत्रउत्सवांत महामंडळाची बस सुसाट

इतर आगारांमुळे
भाविकांची गैरसोय दूर

नाशिक : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावर साजर्‍या होणार्‍या चैत्रोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जा-ये करण्यासाठी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था करुन दिली होती. संप सुरू असतानाही उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करीत महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
चैत्रोत्सव तसेच नवरात्रोत्सवात केवळ एसटी वाहतुकीलाच गडावर परवानगी देण्यात येते. महामंडळानेही ट्रस्टचा विश्‍वास सार्थ ठरविला आहे. नांदुरी पायथा ते श्री. सप्तशृंगीदेवी गड या 11 किलोमीटरच्या घाट रस्त्यावर केवळ महामंडळाच्या बसेसनाच परवानगी असल्याने एसटीने जादा बसेस सोडल्यामुळे भाविकांची जा-ये करण्याची चांगली सोय झाली.कर्मचारी संपाचे पार्श्वभूमीवर या वर्षी ही वाहतूक करण्याचे आव्हान नाशिक विभागासमोर होते. त्यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अहमदनगर, ठाणे आणि पालघर विभागातून बसेस मागविल्या होत्या. तेथील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर महामंडळाने हे आव्हान लिलया पेलले. अतिशय गरजेच्या वेळी चालक- वाहकासह रा प . बसेस पाठविल्या. दिनांक 10 एप्रिल 2022 ते दिनांक 16 एप्रिल 2022 या कालावधीत भाविकांची वाहतूक केल्यामुळे संपाचा कोणताही परिणाम चैत्रोत्सवावर जाणवला नाही. दिवसा उन आणि रात्री थंडी या विषम परीस्थितीत या घाट रस्त्याची पुरेशी माहीती नसतांना देखील या तिन्ही विभागाचे चालक – वाहकांनी अतिशय सुरक्षीत सेवा पुरविली. त्यामुळे महामंडळाच्या संपाच्या़ कालावधीतही महामंडळाने इतर आगाराच्या वाहक-चालकांच्या मदतीने भाविकांची गैरसोय दूर केली.

 

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *