इतर आगारांमुळे
भाविकांची गैरसोय दूर
नाशिक : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावर साजर्या होणार्या चैत्रोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जा-ये करण्यासाठी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था करुन दिली होती. संप सुरू असतानाही उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करीत महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
चैत्रोत्सव तसेच नवरात्रोत्सवात केवळ एसटी वाहतुकीलाच गडावर परवानगी देण्यात येते. महामंडळानेही ट्रस्टचा विश्वास सार्थ ठरविला आहे. नांदुरी पायथा ते श्री. सप्तशृंगीदेवी गड या 11 किलोमीटरच्या घाट रस्त्यावर केवळ महामंडळाच्या बसेसनाच परवानगी असल्याने एसटीने जादा बसेस सोडल्यामुळे भाविकांची जा-ये करण्याची चांगली सोय झाली.कर्मचारी संपाचे पार्श्वभूमीवर या वर्षी ही वाहतूक करण्याचे आव्हान नाशिक विभागासमोर होते. त्यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी अहमदनगर, ठाणे आणि पालघर विभागातून बसेस मागविल्या होत्या. तेथील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर महामंडळाने हे आव्हान लिलया पेलले. अतिशय गरजेच्या वेळी चालक- वाहकासह रा प . बसेस पाठविल्या. दिनांक 10 एप्रिल 2022 ते दिनांक 16 एप्रिल 2022 या कालावधीत भाविकांची वाहतूक केल्यामुळे संपाचा कोणताही परिणाम चैत्रोत्सवावर जाणवला नाही. दिवसा उन आणि रात्री थंडी या विषम परीस्थितीत या घाट रस्त्याची पुरेशी माहीती नसतांना देखील या तिन्ही विभागाचे चालक – वाहकांनी अतिशय सुरक्षीत सेवा पुरविली. त्यामुळे महामंडळाच्या संपाच्या़ कालावधीतही महामंडळाने इतर आगाराच्या वाहक-चालकांच्या मदतीने भाविकांची गैरसोय दूर केली.
हे ही वाचा :
विंचूर/निफाड : विशेष प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले…
इगतपुरीकर सुखावले; गेल्या पाच वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून…
पाच ठिकाणांहून लाखोंचा ऐवज लंपास; चोरीपूर्वी शेतात मद्यप्राशन, नागरिकांत भीतीचे वातावरण जायखेडा : प्रतिनिधी बागलाण…
राज्य शासनाचा नवा निर्णय जाहीर नाशिक : प्रतिनिधी राज्य शासनाने रेती वाहतुकीसंदर्भात नवीन निर्णय जाहीर…
*गाडी बंद रस्ता बंद...? मनमाडला वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त खासदार साहेब आम्हाला या जाचातुन मुक्त…
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…