छत्रपती संभाजी राजेनी घेतला मिसळचा आस्वाद

छत्रपती संभाजी राजेनी घेतला मिसळचा आस्वाद
नाशिक :अश्विनी पांडे
छत्रपती संभाजी राजे गेल्या काही दिवसापासून स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी राज्यभर दौरे करत आहेत. गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्दघाटन केल्यानंतर काल (दि.2)रोजी नाशिक शहरात आले असता कामाच्या व्यापातून वेळ काढत  नाशिकच्या सुप्रसिद्ध  मिसळचा आस्वाद घेतला.
नाशिकची मिसळ राज्यात प्रसिध्द आहे.छत्रपती संभाजी राजे हे खवय्ये असल्याने  गंगापूर  रोडवरील एका हाॅटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी कार्यकर्त्यांसह  गेले.त्यावेळी त्यांनी मिसळ खाण्यासोबत   स्वतः कार्यकर्त्यांना मिसळ आग्रहाने वाढली त्यामुळे कार्यकर्तेही  सुखावले होते. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
यावेळी प्रवक्ते डाॅ. धनंजय जाधव , करण गायकर,   यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.संभाजी राजे साधेपणा भावला
छत्रपती संभाजी राजे  हे राजघराण्यातील मोठी  व्यक्ती असताना त्यांच्यातील साधेपणा कायमच चर्चेचा विषय ठरतो. त्यात काल कार्यकर्त्यांसोबत मिसळ खात त्यांनी मिसळ स्वतःच्या हाताने कार्यकर्यांना मिसळ वाढल्याने  त्यांच्यातील साधेपणाचे पुन्हा दर्शन झाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.

नाशिकची मिसळ जगात भारी
नाशिकच्या मिसळचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे शहरात येणारे मान्यवर मिसळचा आस्वाद घेत असतात. त्यात कलावंत ,राजकारणी ,खेळाडूंचा समावेश आहे.त्यात आता छत्रपती संभाजी राजेच्या नावाचाही समावेश झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *