छावा मराठी माथाडी कामगार युनियन मुळे प्रश्न निकाली
नाशिक: अंबड एमआयडीसी मधील अल्फ इंजिनिअरिंग कंपनीती कमी केलेल्या 25 कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे, छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन च्या प्रयत्नामुळे या कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे,
अल्फ कंपनीत डिसेंबर 2021 मध्ये छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन ची स्थापना युनियन चे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, सेक्रेटरी ऍड, मयूर पांगारकर मार्गदर्शक किशोर भाऊ चव्हाण, खजिनदार भिकन आबा शेळके यांच्यामार्फत करण्यात आली होती, परंतु काही गैरसमजातून कंपनीने कामगारांना कामावरून कमी केले होते, परंतु युनियन चे अध्यक्ष विलास भाऊ पांगारकर, सेक्रेटरी मयूर पांगारकर,, कुलदीप मुसळे, सर्व कामगार सभासद कंपनी मालक डिसुझा, कंपनीचे मॅनेजर रमेश नायर तसेच अंबड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संजय पवार यांचे सहकार्य लाभले, सर्वानी सकारात्मक भूमिका घेतल्याने या 25 कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात आले. यावेळी लेखी करार नामा करण्यात आला.
कंपनीने कामगारांच्या हितासाठी पुढील करारनामा करण्यात आला आहे.
सर्व कामगारांना कंपनीतर्फे परत कामावर रुजू करण्यात आलेले आहे तसेच त्यांना नॉन ब्रेकिंग म्हणजेच अखंडित सेवा करारनामा देखील कंपनी तर्फे कंपनी व युनियन मध्ये पार पडला आहे कामगारांना पीएफ, ईएसआय, बोनस,किमान वेतन, सुरक्षा विषयक संसाधने व इतर सर्व सुविधा देण्याचे कंपनीने सदर करारनाम्यात मान्य केले आहे तसेच कामगारांना मागील वेतन देखील कामगारांना देण्यात आलेले आहे
यावेळी युनियन लीडर म्हणून.कुलदीप मुसळे,संजय सुर्यवंशी व इतर सर्व सभासदांनी वेळोवेळी पाठपुरावा केला यावेळी आदिवासी प्रदेश आघाडीचे शत्रुघन झोंबाड, छावा कामगार युनियन यांचे जिल्हाध्यक्ष .शंकर फडोल,.सलीम शेख, छावा कामगार युनियनचे सल्लागार .जावेद जहुर शेख, विनायक पडवळे,गणेश पाडवी,मनोज गौतम,विशाल रावतले,शांताराम धादड,युवराज गोडे,गोपाळ पाटील, कपुरचंद पाटील,ज्ञानेश्वर काजले,नानाजी गोलीत, भरत ठाकरे इतर कामगार वर्ग उपस्थित होता या ठिकाणी झालेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले व कंपनीचे व्यवस्थापनाचे तसेच कामगार युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित कामगार वर्गातर्फे आभार मानण्यात आले तसेच कामगार वर्गामार्फत आनंद व जल्लोष व्यक्त करण्यात आला..