चेहेडी महादेव मंदिराजवळ स्वतःच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या

 

 

नाशिक: प्रतिनिधी
नाशिक रोड चेहडी कृष्णा कॉलनी येथे 30 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली पोलीस सांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप नाना सहाणे वय 30 सध्या राहणार कृष्णा कॉलनी भगवा चौक मूळ राहणारे चासगाव यांनी चेहेडी महादेव मंदिराच्या जवळ स्वतःच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली आज सकाळी घरातून बाहेर पडताना पत्नीला मंदिरातून दर्शन घेऊन येतो मनात महादेव मंदिर येथे गावठी कट्टे ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली
संदीप हा एका कंपनीत कामाला होता वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते संदीप याने आत्महत्या का केली हे अजून गुढच आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *