*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*
नाशिक: प्रतिनिधी
श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रभू श्री काळारामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांचा सन्मान केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक अध्यक्ष अंबादास खैरे,ॲड. चिन्मय गाढे, संजय खैरनार, शंकर मोकळ यांच्यासह पदाधिकारी व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.