सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार
सातपूर : प्रतिनिधी
नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उदयन राजेनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शौर्य साडेतीनशे वर्ष झाले तरी कोणी विसरले नाही.. भोसले घराण्यात माझा जन्म झाला ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराजांची जयंती जगभरात साजरी केली जाते.परंतु काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करत आहेत. काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केला होता ..या गोष्टीचे वाईट वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. असे खासदार छत्रपती उदयनराजे म्हणाले.
यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.समितीच्यावतीने कार्याध्यक्ष डॉ. वृषाली सोनवणे ,रोहिणी देवरे यांनी राजेंचे औंक्षण केले. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे , समिती कार्याध्यक्ष डाॅ. वृषाली सोनवणे ,उपाध्यक्ष रोहिणी देवरे , सहसचिव हेमंत घुगे, दीपक वाघचौरे यांनी राजेंचा सत्कार केला.यावेळी नितीन निगळ,निवृत्ती इंगोले,किशोर निकम, नरेश सोनवणे रवींद्र देवरे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…