त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाची सोवळे वस्त्र परिधान करत गर्भ गृहात जाऊन पूजा केली. सभामंडपात यावेळी त्यांनी पूजा व अभिषेक केला.मंदिर प्रांगणात साधू महंतांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर
नाशिकच्या आगोदर त्र्यंबकेश्वरचा सिहस्थांत उल्लेख करण्याची मागणी यावेळी साधू महंत यांनी केली. त्यानंतर
कुशावर्तावर जाऊन पाहणी केली, यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर , जिल्हाधिकारी जलज शर्मा होते.