सिडको : प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीत गणेश विसर्जन मिरवणुकीत चुंचाळे शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खाली सापडून एका सहावर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत त्याचे वडील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवार पोलिस चौकीच्या हद्दीत चुंचाळे गाव भागात ट्रॅक्टरवर गणेश विसर्जन मिरवणूक सुरु होती. यावेळी रात्री १० वाजेच्या सुमारास येथील कृष्णा स्विट्स कडून दातीर नगर भागाकडे जाणा-या उतार रस्त्यावर ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत मिरवणुक पाहणा-या गणेश भक्तांवर जाऊन ट्रक्टर धडकला. यात रुद्रा राजू भगत हा सहा वर्षीय मुलगा ठार झाला. तर त्याचे वडील राजू भगत (रा. मारुती संकुल. दत्तनगर) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड चुंचाळे पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…