चौघा आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी
पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटीतील फुलेनगरमधील अल्पवयीन बालिकेला पळवून नेत प्रथम शिरपूर, त्यानंतर मध्य प्रदेशात नेऊन तिची विक्री करून बालविवाह लावण्यात आल्याची खळबळजनक घटना जून 2022 मध्ये उघडकीस आली होती.
याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने कथित पतीसह चार जणांना बालविवाह, पॉक्सो तसेच कलमान्वये दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी व 2.95 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यांपैकी एक लाख रुपये पीडित बालिकेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. उर्वरित तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायालय (कोर्ट क्रमांक 6) न्यायाधीश प्रीती घुले यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त अभियोक्ता सुप्रिया गोरे, लीना चव्हाण यांनी सुनावणीदरम्यान सबळ पुरावे सादर करत प्रभावीपणे युक्तिवाद करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले व पीडित बालिकेला न्याय मिळवून दिला.
शिक्षा झालेल्या आरोपींची नावे प्रियंका देवीदास पाटील ऊर्फ प्रियंका पानपाटील (25, रा. भगतसिंगनगर, ओझर), सुरेखाबाई नागो भिल (40, रा. करवंद गौरव वाइन गार्डनशेजारी, ता. शिरपूर, जि. धुळे), दिनेश सुखराम राठोड (25, रा. बिहारीलाल हुजबंद, पो. भातखेडी, ता. खाजरौद, जि. उज्जैन), काजल सिद्धार्थ गायकवाड (24, रा. राहुलवाडी, पेठरोड, पंचवटी) यांना न्यायालयाने दोषी ठरवले. यातील फिर्यादीची पीडित बालिका ही पुतणी असून, 1 जून 2022 रोजी आरोपी काजलने तिला भांडी घासण्यासाठी पाठवले होते. तिथून पूनमने साथीदारांच्या मदतीने तिचे अपहरण करून शिरपूरला नेले. तिथून सुरेखाबाई या टोळीत सहभागी झाली. शिरपूर येथून पीडितेला मध्य प्रदेशात नेऊन आरोपी दिनेश राठोड याला विक्री करून त्याबदल्यात पैसे घेतले. ती अल्पवयीन असतानाही दिनेशने बालविवाह करत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि. कलम 363, 376 (2), बालविवाह प्रतिबंधक कायदा सन 2006 चे कलम 9 लैंगिक गुन्ह्यांंपासून बालकांचे संरक्षण कायदा सन 2012 चे कलम 4,6,8,12 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी केला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने चौघांना शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, तपासी अंमलदार व कोर्ट अंमलदार यांनी गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
Child marriage, sale after kidnapping of girl from Panchavati
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…