ओढणीने गळा आवळून
प्रियकराकडून प्रेयसीचा खून
पंचवटीतील धक्कादायक घटना
पंचवटी : प्रतिनिधी
दुसर्यासोबत मोबाइलवरून चॅटिंग करीत असल्याचा राग येऊन प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यांनतर मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून दुचाकीहून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकला. बुधवारी (ता.23) सकाळी प्रियंका विरजी वसावे (वय 19, मु.पाटबारा, पो.जमाना, ता. अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार) हिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवत अवघ्या सहा तासांत संशयित प्रियकरास शिताफीने बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सागर चिवदास तडवी (वय, 21, मूळ राहणार नंदुरबार, हल्ली राहणार, माऊली नगर, अंबड, नाशिक) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. प्रियंका सध्या औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये परीचारिकेचे शिक्षण घेत होती. प्रियंका व सागर यांची जुनी मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. सोमवारी (ता.22) दुपारी प्रियंका अंबड येथे राहत असलेल्या सागरच्या घरी सायंकाळी गेली होती. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास प्रियंका दुसर्या कोणाशी मोबाईल फोनवर चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संतप्त झालेल्या सागरने प्रियंकाचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. यानंतर भानावर आलेल्या सागरने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियंकाचा मृतदेह चारचाकीतून उड्डाणपूल मार्गे बळी मंदिर येथून रासबिहारी लिंकरोड वरील मिरद्वार लॉन्स शेजारी मोकळ्या जागेत मृतदेह फेकून दिला. बुधवारी (ता.23) सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथून जाणार्या एका नागरिकास, याठिकाणी एक युवती मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लागलीच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत, मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तापसी पथके रवाना करण्यात आली. पोलीस हवालदार कैलास शिंदे व पोलीस नाईक संदीप मालसाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून संशयित सागर तडवी याच्या अंबड येथील घरी पोहचले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन सोहन माछरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी,रोहित केदार, पोलिस हवालदार सागर कुलकर्णी, राजेश सोळसे ,अनिल गुंबाडे, दिपक नाईक, कैलास शिंदे,,पोलिस नाईक निलेश भोईर,संदीप मालसाने, पोलिस अंमलदार धनशाम महाले,वैभव परदेशी, नितीन पवार,गोरख साबळे, श्रीकांत साळवे यांनी संयुक्तिक रित्या केली आहे
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…