घटना सीसीटीव्हीत कैद
लासलगाव :समीर पठाण
लासलगाव शहरातील बाजारपेठेत असलेल्या झेंडा चौक येथील दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार शेजारील दुकानात असलेल्या सी सी टी व्हि मध्ये कैद झाला आहे.या संदर्भात लासलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास पोलीस करीत आहे.या बाबत मिळालेल्या माहिती नुसार शहरातील झेंडा चौक बाजारपेठेत असलेल्या हर्षदिप वस्त्रालय नावाच्या कापड दुकानासमोर बुधवारी सायंकाळी 05/45 वाजेच्या दरम्यान मयुर सुधीर झांबरे यांनी होंडा ड्रीम युगा काळ्या रंगाची व लाल रंगाचा पट्टा असलेली मोटार सायकल क्रं MH 15 FB 2184 लावलेली होती,त्यावेळी पाऊस चालु असल्यामुळे घाईघाईत मोटारसायकलला चावी तशीच राहून गेली.पाउस बंद झाल्यानंतर गाडीची चावी काढण्यासाठी झांबरे दुकानाबाहेर गेलो असता मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच शेजारील दुकानात लावलेल्या सी सी टी व्ही फुटेज त्यांनी चेक केले असता कोणीतरी अज्ञात इसम गाडी सुरू करुन घेवुन जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.तातडीने त्यांनी आजूबाजूला या इसमाचा व मोटारसायकल चा शोध घेतला परंतु दोघेही मिळून आले नाहीया संदर्भात लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…