नाशिक लोकसभेसाठी चुरस  

 

लोकसभा निवडणुकीसाठी सात आठ महिने बाकी असले  सर्व राजकीय पक्षांनी तसेच इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ केला आहे. तर पक्षीय पातळीवर जागावाटपाचे सूत्र ठरवण्याचे मंथन सुरू झाले आहे. यंदा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अधिक गोंधळाची असल्यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. राज्यातील 48 पैकी नाशिक लोकसभेची जागा लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.

त्याचवेळी नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपच्या काही नेत्यांनी आतापासूनच दावा करायला सुरुवात केली आहे. त्यात ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांचे नाव आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या ठिकाणी समीर भुजबळ राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले होते. आता पुन्हा समीर भुजबळ यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे.  त्यात आता राष्ट्रवादीत ही दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे निवडणुक अधिक रंगतदार होणार यात शंका नाही.

 

मात्र केंद्रात ,राज्यात सत्ता असलेल्या आणि नाशिक महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिक मध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपसाठी खासदारकीचा मार्ग सोपा असला तरी नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्याने भाजपाने आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केल्याने निवडणुकीत नेमकी ही जागा कोणाला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तर चार टर्मपेक्षा अधिक काळ नगरसेवक असलेले दिनकर पाटील यांचेही नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे.तर दिनकर अण्णा लोकसभेसाठी प्रबळ उमेदवार ठरू शकतील असा अंदाज ही वर्तवण्यात येत आहे.कारण दिनकर अण्णा यांनी केलेल्या विकासामुळे नाशिक लोकसभा क्षेत्रात अण्णांच्या कामाचा डंका वाजत आहे.

विशेष करून प्रभाग क्र 9 मध्ये झालेली विकासकामे डोळे दिपवणारी आहेत. त्यामुळेच लोकसभेसाठी दिनकर अण्णा पाटील यांची दावेदारी प्रबळ ठरत आहे.

 

 

 

नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळे कामांना जोरदार  सुरुवात केली आहे.

 

दिनकर पाटील यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि आपल्या कामातून जनतेला तात्काळ न्याय देण्याच्या स्वभावाने नाशिक लोकसभा मतदार संघात पाटलांची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार म्हणून निवडून आले. त्यांची ही  खासदारकीची दुसरी टर्म होती. त्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे त्यांना लोकसभा निवडणुक जड जाण्याचे चिन्ह आहे. तर याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगञ भुजबळ आणि समिर भुजबळ यांनी निवडणुक लढवली होती. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवार गटाकडून  ही जागा मागितली जाण्याची शक्यता आहे.. अशा परिस्थितीत सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत  गोडसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस गटाचे छगन  भुजबळ या दोघांना ही जागा न देता .भाजपा नाशिक लोकसभा लढण्याची चिन्ह आहे. त्याचा प्रत्यय गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देऊन आल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे एकीकडे दिनकर अण्णांचा कामाचा झपाटा आणि भाजपाने नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यास अण्णाच्या विजयाची वाट सुखकर होऊ शकते.

 

दिनकर पाटलांचा शहरी भागाबरोबर     ग्रामीण भागातही जनसंपर्क आहे. दिनकर अण्णांचा राजकारणाबरोबर धार्मिक कार्यातही मोठा सहभाग असतो.   पाटील हे मुळचे महानुभावपंथीय आहेत. एकमुखी दत्तावर त्यांची  श्रद्धा आहे.  त्यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या राष्ट्रीय संघटकपदी, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या केंद्रीय संमेलन प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीकडून जगन्नाथपुरी ओडिशा येथे हिंदू राष्ट्र सर्वधर्म समभाव पुरस्कार, हिंदू संस्कृती रक्षक संघाकडून हिंदू धर्म रक्षक म्हणून पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

 

दिनकर पाटील गेल्या दोन वर्षापासुन लोकसभेसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे ते निवडणुकीला उभे राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या काळात ते काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

 

 

 

 

विकासाकडे झेप घेणारा प्रभाग क्र 9

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 चे माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी त्यांच्या चार टर्मच्या   कारकीर्दीत आपल्या प्रभागात वेगवेगळी विकास कामे करत  नागरिकांची मने जिंकली आहेत. दिनकर पाटील हे याच प्रभागातून नाशिक महानगरपालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत हीच त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे प्रभागातील नागरिक सांगतात.   काँग्रेस शहर अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.  भाजपात आल्यानंतर ही आपल्या कामाने नवीन पक्षात ही आपली वेगळी छाप  पाडली आहे.  त्यामुळेच प्रभागातील अनेक विकासकामांच्या उदघाटनासाठी थेट भाजपाचे वरिष्ठ नेते आले होते.

गेल्या पाच वर्षात कोरोना काळ असतानाही त्यांच्या प्रभागात झालेली विकासकामे ही डोळे दीपवणारी आहेत.  येत्या काळात नाशिक लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.   दिनकर पाटील यांनी आपल्या नगरसेवक कारकिर्दीत केलेल्या सामाजिक, राजकीय ,धार्मिक कार्यामुळे दिनकर अण्णा पाटील यांनी होऊ घातलेल्या लोकसभेचे नेतृत्व करावे अशी इच्छा प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत. तर  नाशिकच्या राजकीय क्षेत्रात दिनकर अण्णा पाटील यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपा नाशिक लोकसभेचे उमेदवार दिनकर पाटील ठरणार का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शाळा ,व्यायामशाळा ,क्रीडांगण,मंदिरे,जलकुंभ,हाॅस्पिटल,उद्याने या सारखी विकासकामे करत आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळेच दिनकर अण्णा पाटील यांचा प्रभागातच नाही तर  नाशिक शहराच्या राजकारणात  दबदबा आहे.  दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रमाणे त्यांच्या पत्नी लता दिनकर पाटील या देखील दोन टर्म नगरसेविका राहिल्या आहेत. तर त्यांचे पुत्र अमोल पाटील ही युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आग्रेसर असतात.

 

छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेचे लोकार्पण

 

शिवाजी नगर येथील मनपाच्या  छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर शाळेचे  लोकार्पण करण्यात आले आहे.  एका बाजूला शहरातील मनपा शाळा विद्यार्थी नसल्याने  बंद पडत असताना या प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी मात्र गरीब कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध होण्यासाठी विशेष मेहनत  घेऊन प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरातील सर्वात मोठी इमारत असलेली शाळा उभारली आहे. दोन वर्षापूर्वी शिवाजीनगर येथील  शाळेचा ग्राउंड इमारतीचे लोकार्पण माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व केंद्रीत मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पण याच वेळी दुसर्‍या मजल्यासाठीचाही निधी दिनकर पाटील यांनी मंजूर करून घेतल्याने काही महिन्यांत भव्य इमारत उभारण्यात आली आहे. खासगी शाळेतही अशी सुविधा नाही अशा सर्व आत्यआधूनिक सुविधा या शाळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शिष्यरवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सातपूर मधील शाळाचांच नंबर असतो. त्यात शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज शाळेच्या विद्यार्थ्यांचा मेरिट लिस्टमध्ये पहिल्या दहात हमखास समावेश  असतो .

 

प्रभागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दिनकर अण्णा पाटील यांनी ठिकठिकाणी जलकुंभ उभारले आणि या जलकुंभाना   समाजातील  आदर्श महापुरुषांची नावे दिली आहेत. श्री स्वामी समर्थ जलकुंभ श्रमिक नगर ,कै. वसंतराव फुलसिंग नाईक जलकुंभ शिवाजीनगर ,लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे जलकुंभ धृवनगर ,अण्णाभाऊ साठे जलकुंभ शिवाजीनगर उभारत प्रभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे.

 

इतकच नाही तर पाण्यासह शिक्षणातही आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी आद्यधुनीक शाळा उभारले आहेत शाळेंप्रमाणेच या

 

प्रभागात तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायाम शाळेची ही उभारणी करण्यात आली आहे. शिवछत्रपती व्यायाम शाळा , संभाजी राजे व्यायाम शाळा कै. वसंतराव नाईक व्यायाम शाळासह  तब्बल 40 ग्रीन जिम्स उभारत प्रगातील नागरिकांना सुदृढतेची दक्षता घेतली आहे.

 

व्यायाम शाळेसह आपल्या प्रभागात उद्यान व उद्यानांना देखील महापुरुषांची नावे देत सर्व जातीधर्मातील नागरिकांना एक संघ बांधून ठेवण्याचे कार्य अण्णांनी  केले आहे. यात राजमाता जिजाऊ उद्यान, महाराणा प्रताप उद्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यान, महात्मा ज्योतिबा फुले उद्यान, संत गाडगे महाराज उद्यान, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, आणि हॉल मासाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नरेंद्राचार्य महाराज उद्यान जेष्ठ, नाटक कै. वसंतराव कानेटकर उद्यान यासारखी उद्याने उभारली आहेत.

 

याचप्रमाणे  प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या  दृष्टीने ही अण्णांनी आपल्या प्रभागात विविध अशी कार्य केली आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मॅटरनिटी हॉस्पिटल उभारले आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा या मोफत मिळतात.

 

याचप्रमाणे प्रभागात  क्रीडांगणही उभारण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकाराम महाराज क्रीडांगण उभारले आहे. यामाध्यमातून जॉगिंग ट्रॅक ,बास्केटबॉल ,हॉलीबॉल ,कबड्डी क्रिकेट यासारख्या खेळांसाठी मैदाने  उपलब्ध असून या ठिकाणी सीसीटीव्ही, म्युझिक सिस्टीम, ग्रीन जिम आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव देण्यास संधी मिळते.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम्युनिटी हॉलची निर्मिती केली. धार्मिक संस्कार होण्यासाठी प्रभागात श्रीमद्भागवत कथा ,सागर ,रामायण कथा ,हरिनाम सप्ता आणि आधी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अण्णांच्या वतीने करण्यात येते. यात सामाजिक एकता  निर्माण होण्यासाठी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव ,तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य कुस्त्यांचा दंगलींचे दरवर्षी आयोजन करण्यात येते .

 

नागरिकांना आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा आणि शववाहिका सेवा दिली आहे .

 

त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात शंभर मंदिरांची आणि संस्कार केंद्रांची उभारणी देखील केली आहे. यामुळे अध्यात्मिक कार्यात भर पडत आहे.

 

त्याचप्रमाणे महिलांना देखील मदत व्हावी यासाठी महिला बचत गटांना देखील अण्णांच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य करण्यात येते. तरुणांच्या रोजगारांसाठी शिवछत्रपती भाजी मार्केट क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मार्केटची उभारणी दिनकर पाटील यांच्या  नेतृत्वाखाली झाली आहे.

 

भाजीपाल्यासह वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही व कर्ता पुरुष हायात नाही अशा नागरिकांना दरमही मोफत धान्य पाटील यांच्या माध्यमातून दावे जाते.

 

प्रभागात औषध फवारणी. मोफत अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट , दर शनिवारी मोफत नेत्र तपासणी यासारखे शिबीर राबवण्यात येतात. त्याचप्रमाणे प्रभागात प्रत्यक्ष शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आधार कार्ड शिबिर, श्रम कार्ड शिबिर अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन  करण्यात येते.

 

प्रगाग क्रमांक 9 चा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी  माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्यामाध्यमातून मोठ्या जोमात सर्वांना एकत्रित घेत विकास कामे करण्यात येतात.

 

कोरोनाकाळातील कार्य

कोरोना काळात  प्रभागातील नागरिकांना वेळोवेळी विविध प्रकारची मदत आणि सहकार्य करण्यात आले. यात प्रभागातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळावा यासाठी माजी नगरसेवक दिनकर पाटील व माजी नगरसेविका लताबाई दिनकर पाटील व युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रभागातील वीस हजार घरांमध्ये मोफत भाजीपाला वाटप करण्याचा संकल्प केला होता .गंगापूर ,गोवर्धन ,सोमेश्वर मंदिर परिसर, शिवाजीनगर ,ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी ,श्रमिक नगर, अशोक नगर, संभाजीनगर ,वास्तु नगर ,स्वामी विवेकानंद नगर, राधाकृष्ण नगर या भागातील सुमारे 29 हजार 440 घरांमध्ये भाजीपाला वाटप  करण्यात आला.

 

– अश्विनी पांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *