सिडको : वार्ताहर
कामटवाडे परिसरातील सायखेडकर हॉस्पिटल परिसरातील घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत चोरांनी 13 लाख 98 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राजेश जगन्नाथ गायकर फ्लॅट नंबर 1 श्री समर्थ कृपा बंगलो, लक्ष्मी नगर, कामटवाडे, अंबड लिंक रोड, सायखेडकर हॉस्पिटलच्या मागे त्रिमूर्ती चौक, सिडको.हे कामानिमित्त सहपरिवार नांदगाव येथे गेलेले असताना घराच्या खिडकीच्या खालचे बाजूचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश करून कपाटातून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
4 तोळे वजनाची सोन्याची पोत,, 2 तोळे वजनाचे नेकलेस,, 1 तोळे वजनाची सोन्याचे अंगठी,, 4 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या नठी,, 1 तोळा सोन्याची वजनाची चैन,, 3 तोळा वजनाचे सोन्याचे कानातले,,, 3 तोळा वजनाचे तीन सोन्याच्या अंगठ्या, 5 तोळे वजनाचे सात सोन्याच्या अंगठ्या,, 2 तोळे वजनाचे सोन्याचे लहान मुलाचे कानातील दागिने,, 4 तोळा वजनाचे सोन्याचे मोठे नेकलेस, 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे लहान नेकलेस,, 2 तोळा वजनाचे सोन्याचे दोन कॉइंन,, 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे पाच कॉइंन, 1 तोळा वजनाचे सोन्याचे मनी,, 4 तोळा वजनाचे सोन्याचे गळ्यातली पोत,
6 तोळा राजनाचे सोन्याच्या बांगड्या, 8 किलो वजनाचे वेगवेगळे चांदीचे दागिने व तीन लाख रुपये रोख असा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…