सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडकोतील दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी (दि. ७) रात्री ११.४५ वाजता घडली.यावेळी या गुंडांनी तलवारीही परजत परिसरात दहशत माजवली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्यां गोळीबाराच्या घटनेनंतर अंबड पोलिसांनी गोळीबारातील दर्शन दोंदे व गणेश खांदवे यांना अटक करण्यात आली असुन अन्य फरार संशयीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत या बाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. यावेळी काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद देखील मिटला होता.त्यानंतर सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने रात्री ११.३० च्या सुमारास वैभव शिर्के यास बोलावून घेतले, दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. दोंदे याने गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले.यावेळी वैभवने आपला जीव वाचवण्यासाठी पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली.मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने या ठिकाणी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत दोघा टोळीतील संशयीताचा शोध घेतला असता दर्शन दोंदे व गणेश खांदवे यांना अटक करण्यात आली असुन अन्य फरार संशयितांचा अंबड पोलीसांकडुन शोध सुरू आहे