सावतानगर भागात बिबट्याचा वावर

सावतानगर भागात बिबट्याचा वावर

सिडको : प्रतिनिधी
सिडको (सावता नगर )शुक्रवारी पहाटे शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
बिबट्याला ताबडतोब वन विभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे अशी मागणी सध्या आसाम दौऱ्यावार असणाऱ्या शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे केली आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण झोपेत असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पहा व्हीडिओ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *