मुले पळविण्याच्या संशयातून सिडकोत महिलेला मारहाण
नाशिक: प्रतिनिधी
सिडको भागात पुन्हा एकदा महिलेला मुलं पळवणारी समजून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल झाला असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. तर कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.
कोणीतरी सोशल मीडियाचा गैरफायदा घेत शहरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय आहे, सतर्क राहावे असा महाराष्ट्र पोलिसांच्या नावानेच मेसेज व्हायरल केला. पाहता-पाहता हा मेसेज नाशिममध्ये इतका व्हायरल झाला की, नागरिक हे मोठ्या भीतीच्या आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे किरकोळ विक्रेत्यांकडे संशयाच्याच नजरेने पाहात आहेत. अनेक ठिकाणी काही जणांना नागरिकांनी मुलं पळवणारे समजून मारहाणदेखील केली आहे. काल रात्रीच्या सुमारास सिडको परिसरातील राणाप्रताप चौकातून जात असलेली एक महिला ही मुल पळवणारी असल्याचे समजून मारहाण करण्यात आली