सिडको : प्रतिनिधी
उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात मोबाईलचा स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले. घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली.
या घटनेतील तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका का ? आणि कसा झाला. याचा अधिक तपास करत आहे.