सिडकोत किरकोळ वादातून युवकाचा खून
नाशिक – वार्ताहर
सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच सिडकोत पुन्हा गंभीर घटना घडली आहे. किरकोळ वादातून २४ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्यास जीवे ठार मारण्यात आले आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सावतानगर परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून यामुळे सिडकोतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे. परशुराम बाळासाहेब नजान असे मृत युवकाचे नाव असल्याचे समजते. परशुराम हा सावतानगर परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता. तिथे दोन गटात वाद झाले. त्यातून टोळक्याने परशुराम याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या या युवकास जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असून सिडकोत वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…