सिडको : प्रतिनिधी
शहरातील सिडको परिसरात आज भरदिवसा एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. तब्बल ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हत्या झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव संदीप आठवले (वय २२) असे आहे. जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात हे हत्याकांड घडले आहे. दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन हल्लेखोर आले. त्यांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. भर दिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे,