सिडको हादरले:  होळीच्या दिवशी  जुन्या वादातून युवकाचा खुन

सिडको हादरले:  होळीच्या दिवशी

जुन्या वादातून युवकाचा  खुन
सिडको विशेष प्रतिनिधी:-शहर आणि होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोसेफ चर्च समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकावर चार जणांनी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सुमित देवरे (वय ३०) या युवकावर अरुण वैरागर याने चॉपरने वार करून गंभीर जखमी केले दरम्यान जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्च समोर सुमीत देवरे (वय ३० रहा शुभम पार्क जवळील नाक्याजवळ) या उभा असतांना यावेळी अरुण वैरागर याने जुन्या भांडणाची कुरापत काढुन वाद करु लागला यावेळी अरुण वैरागर याने आपल्या जवळ असलेल्या दोन चॉपरने सपासप वार केले यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळला दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलीसांना कळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्याला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, ऐन होळीच्या सणादिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावला.
प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. जखमी सुमित देवरेवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुमीतवर उपचार उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
या प्रकरणी आरोपी अरुण वैरागर याच्या सह अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. होळीच्या सणावर या घटनेमुळे विरजण पडले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शुभम पार्क जवळील जोसेफ चर्च समोर खुनाची घटना घडल्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, युनिट १ चे मधुकर कड, युनीट २चे हेमंत तोडकर आदी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पहाणी करत आरोपीच्या तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *