सिने स्टाईल पाठलाग करत दोन तरुणांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत
लासलगाव प्रतिनिधी
शहरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील २ तरुणाना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घतले.त्याच्या ताब्यातून तीन गावठी कट्टा,नऊ जिवंत काडतूस आणि शाईन मोटार सायकल असा एक लाख आडोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली.सिने स्टाईल पाठलाग करत विंचूर तीन पाटी येथून दोन बावीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लासलगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटार सायकलने पहाटे अडीच ते पावणे तीन च्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ,अविनाश सांगळे,आप्पासाहेब मांजरे यांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना विंचूर त्रिफुली येथे पकडले यात अनिकेत कैलास मळेकर रा धायरी,पुणे वय २२ आणि नामदेव रामभाऊ ढेबे रा.धायरी,पुणे वय -२२ या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांकडे ३ देशी कट्टा आणि ९ जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली. लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता,यापूर्वी त्याने शस्त्रे विकली काय याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.डीवायएसपी डॉ निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी भास्करराव शिंदे आणि लासलगाव पोलीस अधिकचा तपास करत आहे
विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…
जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…
वंचित दोनशे शेतकर्यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…
शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…
गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…
आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…