अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी
पाहा व्हिडीओ
सिडको। दिलीपराज सोनार
:-अंबड परिसरातील फडोळ मळा येथे बुधवारी रात्री चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून, काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान याठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील काही टवाळखोरांनी दहशत माजवत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना सर्वश्रुत असतांना आता पुन्हा हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
फडोळ मळा परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्सखाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन गटांतील चार ते पाच जणांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव केला. काहीजण हातात लाकडी दांडके घेऊन आले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही झटापट तब्बल १५ ते २० मिनिटे सुरू होती.तसेच याठिकाणी असलेल्या दुकांमधील टेबल खुर्च्याची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण केला याबाबत स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात भम्रणध्वनीवरुन माहिती देण्यात आली त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलिस फौजफाटा घटनास्थळी रवाना केली अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली आणि परिसरातील तणाव निवळवला.घटनेचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून, काही व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, हाणामारीमागील मूळ कारणाचा तपास सुरू आहे. अंबड पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.