व्यावसायिकांची अस्तित्वासाठी सर्कस

व्यावसायिकांची अस्तित्वासाठी सर्कस
अखेरची घरघर: प्राणी, पक्ष्यांवरील बंदीचाही फटका
नाशिक ः देवयानी सोनार
शासनाने 2008 पासून सर्कशीत प्राणी पक्षांना बंदी तसेच जागेच्या भाड्यात सूट देणे बंद करण्यात आल्याने आधीच आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या सर्कशींना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागत आहे. अनेक अडचणींना या व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. कोरोना संकटात सर्कशींना अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आली आहे. जवळपास 250 ते 200 सर्कशीपैकी अवघ्या 5 सर्कशी सद्या अस्तित्व टिकवून आहेत.
60 ते 70 हजार रुपये दर दिवसाप्रमाणे जागेचे भाडे आकारले जाते.धार्मिक किंवा समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी भाडेदर कमी असतो त्याप्रमाणे सर्कशीलाही भाडेदरात सूट मिळावी, अशी या व्यावसायिकांची मागणी आहे.  एका गावाहून दुसर्‍या गावी जाण्यासाठी होणारा वाहतूक खर्च,जागेचे भाडे यांची जुळवाजुळव करतांना सर्कस व्यावसायिकांच्या नाकीनऊ येत आहेत. गेल्या 35 ते 40 वर्षापासून सर्कस आणि कलाकांरांची कला जिवंत ठेवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.
सरकारी अनुदान मिळावे, जागा भाड्यात सूट मिळावी,प्राणी पक्षांची आम्ही विशेष काळजी घेत असल्याने सर्कशीत त्यांचा वापर करू देण्याची मुभा द्यावी अशा मागण्या सर्कस चालकांच्या आहेत.
सर्कस लहानपणी अनेकांनी पाहिलेली आहे.त्यातील विविध प्राणी पक्षी यंाच्या शिस्तबद्ध हालचाली,सिंह,वाघ,हत्ती घोडे यांच्या कसरती,लंबू टिंगू जोकरची हास्यांची धमाल,सायकर,मोटारसायकल,छोटी कार आदींवर कलाकारांच्या चित्तथरारक कवायत,रिंग डान्स,ङ्गायर डान्स,गाड्या उडविणे,उंच हवेत हेलकावे खात इकडून तिकडे झोकून देणे,झोपाळा खेळणे,श्‍वास रोखायला लावणार्‍या कसरती करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली जात असत.
2008 पासून सर्कशीत प्राणी, पक्ष्यांचा वापर बंद करण्याचे आदेश असल्याने सर्कशीवर परिणाम होण्यास  सुरूवात झाली. कलाकारांवरही परिणाम झाला. कलाकारांना केवळ सर्कशीतील कसरती किंवा आपल्या कलेशिवाय दुसरे काम माहिती नसल्याने या कलाकारांना सर्कशी बंद झाल्याने बेरोजगारीची चिंता भेडसावत आहे.
पडद्यामागे 200हून अधिक मजुरांचे हात काम करीत असतात. त्यांना रोजगार मिळावा,कलाकारांना काम मिळावे यासाठी मोठ्या सर्कस मालकांची सर्कशी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या जवळील तुटपुंजी मदत करीत वाटा उचलत , कलाकारांना आपली कला पुढील पिढीसाठी जिवंत ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे.
सोशल मीडियाच्या जमान्यात पुढच्या पिढीला सर्कस काय असते किंवा सर्कशीत कशा कसरती दाखविल्या जातात हे समजण्यासाठी सर्कशींचे अस्तित्व टिकणे गरजेचे आहे.उरल्या फक्त 5 ते 10  सर्कशीएकेकाळी बच्चे कंपनींच्या पसंतीला उतरलेल्या सर्कसमध्ये प्राणी, पक्षी यांच्या वापरास बंदी घातल्याने सर्कशीचे आकर्षण कमी होत गेले. त्यातच दोन वर्षे कोरोनामुळे अनेक सर्कस कंपन्यांना  आपले अस्तित्व टिकवता आले नाही.
त्यामुळे भारतातील सुमारे 200 ते 250  पैकी केवळ 5 ते 10  सर्कस कंपन्या सद्या आपले अस्तित्व टिकण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर आता सर्कशीचे शोज सुरु होत असून, एशियाड सर्कशीचा हा लॉकडाऊन नंतरचा केवळ पाचवा शो आहे. यापूर्वी गुजरात जयपूर, उदयपूर, इंदूर या ठिकाणी सर्कशीचे शो झाले आहेत. जेमिनी,एशियाड, रॅम्बो, गोल्डन, जम्बो या पाच सर्कशी अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

2008पासून सर्कशीत प्राण्यांचा वापरावर बंदी करण्यात आली असल्याने सर्कशीचे आकर्षण कमी झाले.त्याशिवाय सर्कशीसाठी  जागेचे भाडे 60 ते 70 हजार दर दिवसाप्रमाणे असते ते परवडत नाही.सरकारकडून अनुदान सबसिडी मिळावी, प्राणी पक्षांचा आम्ही उत्तम प्रकार सांभाळले जातात त्यामुळे त्यांचा वापर करण्यास मिळावा
अंकलेश्‍वर भास्कर
व्यवस्थापक
एशियाड सर्कस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *