मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याला नागरिकांचा विरोध…मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना केला विरोध

मनमाड(प्रतिनिधी) :- बहुप्रतिक्षित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली असुन या रेल्वे मार्गासाठी आज भूसंपादन प्रक्रिया होणार होती मनमाड शहरातील गर्डरशॉप या ठिकाणी  महसूल व रेल्वेच्या विभागाचे संयुक्त पथक मोजणीसाठी आले होते मात्र या मोजणीला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला असुन आमच्या थोड्या थोड्या जागा घेण्यापेक्षा संपूर्ण जागा घेऊन आम्हाला रेडिरेकनर प्रमाणे मोबदला द्यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.स्थानिक रहिवाशांची वरीष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून त्यांना त्यानंतर मोजणी करू असे मत मोजणी अधिकारी एस एम गुळवे यांनी व्यक्त केले आहे.
                गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुप्रतिक्षित मनमाड इंदूर रेल्वे मार्ग दृष्टीपथात पडत असुन या प्रकल्पाला लागणारी जमीन भूसंपादन करण्यासाठी सोमवारी मोजणी करण्यात येणार होती मात्र या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला असुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी वर्गाला या नागरिकांनी विरोध केला आहे भूसंपादन करण्यासाठी आमचा विरोध नसुन रेल्वेच्या वतीने थोड्या प्रमाणात जागा घेण्यात येणार असुन थोडी थोडी जागा घेण्यापेक्षा सर्वच जागा घेऊन आम्हालही मोकळ करावे अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी आज मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले होते.या मोजणीसाठी मंडल अधिकारी एस एम गुळवे रेल्वेचे ज्युनियर इंजिनिअर मनोज मोकळं
कृषी विभागाचे रणजीत रणवरे, भूमिअभिलेखकचे राजेंद्र कोळपे,मंडळ कृषी अधिकारी प्रताप हाके नगर पालिकेच्या  सहायक नगर रचना प्रमुख रागिणी चव्हाण जीवन प्राधिकरणचे  चौरे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे  उपअभियंता भावसार व  जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या सोनाली जाधव यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेच्या व इतर सबंधित विभागासोबत बैठक करुनच भूसंपादन करावे..! 
आम्ही गर्डर शॉप मध्ये कित्येक वर्षांपासून राहतो आमच्या कुटुंबातील अनेक सुख दुःखाच्या आठवणी या जागेसोबत जोडलेल्या आहेत रेल्वे आता काही जागा घेईल व काही तशीच सोडुन देईल यामुळे आमच्या ती उपयोगी पडणार नाही मुळात आम्ही या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला असुन आम्ही स्वतः रेडिरेकनरच्या दराप्रमाणे आमची जागा देण्यासाठी तयार आहोत तशा पद्धतीची आम्ही मागणीही केली आहे रेल्वेच्या व इतर संबंधित विभागाची एकत्रित बैठक लावावी व त्यांनतरच आवश्यक भूसंपादन करावे अशी आम्ही मागणी केली आहे.
– डॉ संजय सांगळे स्थानिक रहिवासी 
पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर भूसंपादन करू..!
आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार मोजणी करण्यासाठी आलो होतो स्थानिक पातळीवर सर्व रहिवाशांसोबत चर्चा केली त्याना समजवून सांगितले त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले मुळात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यावरच आम्ही भूसंपादन करण्यासाठी मदत करू अशी भूमिका स्थानिकांनी घेतली त्यामुळे नाईलाजाने भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व प्रकार कळविला असुन याबाबत पुढिल आदेश मिळाल्यावरच कारवाई करू.
 –एस एम गुळवे मंडल अधिकारी
Citizens oppose land acquisition for Manmad-Indore railway line...
Oppose officials who came to conduct census

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *