समाधान देवरे यांचा उपक्रम
नाशिक: प्रतिनिधी
अशोकनगर येथील रायगड प्रतिष्टानचे संस्थापक समाधान देवरे आणि वैशाली देवरे या समाजकार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या दाम्पत्याने आयोजित केलेल्या मोफत शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात या शिबिरात अकुप्रेशर, सांधे वात, ब्लडप्रेशर, दमा, हाडांचे विविध आजार, हातापायाला मुंग्या येणं, हृदयाशी संबंधीत विविध समस्या, जुनी सर्दी, खोकला, पोट दुखी, कंबरेचे आजार, थायरॉईड यावर अकुप्रेशर थेरेपी, मसाज थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले, राजस्थान मधील तज्ञ डॉ, आर के शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरातील नागरिकांवर उपचार केले, आठवडाभर दिवसबर चालू असलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, परमपूज्य अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला, शिबिरात दररोज सकाळी मोठ्यासंख्येने नागरिक येत असल्याने रांगा लागत आहे, शिबिरात येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून समाधान देवरे हे जातीने हजर तर असतातच पण सिद्ध हनुमान आणि महारुद्र हनुमान मंडळ चे सदस्य मारुती आभाले, दत्तू उशीर, नारायण पवार, विश्वनाथ कवडे, भामरे, मुकुंद कुलकर्णी आदी या ठिकाणी जातीने हजर राहून परिश्रम घेत आहेत,
नागरिकांकडून कौतुक
कोरोनाच्या काळात समाधान देवरे यांनी या भागातील जनतेच्या सोयीसाठी ऑक्सिजन, अंबुलन्स सेवा तसेच नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवण्यात समाधान देवरे हे आघाडीवर होते, कोणत्याच प्रकारचं पद नसतानाही या भागात लोकहिताचे उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असलेल्या देवरे यांचे या भागातील नागरिक कौतुक करत आहेत,