सत्यजित तांबे : राजकीय साक्षरतेचा अभाव
नाशिक : प्रतिनिधी
शहर विकास हा पक्षीय राजकारणा पलिकडे जाऊन पाहायला हवा, दुर्दैवाने तसे होत नाही. पुणे,ठाणे,नाशिक आणि नागपूर चार शहरे सोडल्यास बाकीच्या 27 महापालिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दुर्दैवाने मागच्या दहा पंधरा वर्षात लोकांच्या अपेक्षा संपत चालल्या आहे. नागरिकांचे दबावगट पूर्वी असायचे ते आता राहिले नाही.नवी मुंबईत नागरिकांचे दबावगट दिसून येत नाही. औरंगाबाद, नगर, अकोला, धुळे या महापालिकांची अवस्था अतिशय वाईट आहे. असे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
सिटीझनविल या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी झाले. शासन,लोकसहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञान यांंचा समन्वय साधून काही प्रश्नांची उत्तरे कसे सापडतील यावर आधारित सिटीझनविल पुस्तक आहे. या पुस्तकाशी संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींशी काल सत्यजित तांबे यांनी संवाद साधला. हे पुस्तक आणि त्यातील संकल्पना सामान्यांपर्यत पोहोचले पाहिजे यासाठी माध्यमांचा पर्याय निवडून जनतेपर्यंत पोहण्याचे प्रयत्न सुरू आहे.असेही यावेळी सत्यजीत तांबे यांनी विचार मांडले.
शहर विकास मुळता पक्षीय राजकारणाच्या वर जाणे हा गरजेचा विषय झाला आहे. शहराचा विकास होत आहे. 2013 /14 हार्वड युनिव्हर्ससिटीत गेलो असता प्राध्यापकंानी हे पुस्तक वाचायला दिले होते.या पुस्तकात 13 ते 15 भारतीयांचा उल्लेख केलेला आहे.ज्या भारतीयांनी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये बदल घडून आणण्यास मदत केली आहे.सिलिकॉन व्हॉलीतील हे शहर असल्याने अनेक भारतीय आयटी कंपन्या प्रमुख पदावर काम करीत आहे. भारतीयांनी तिथे जाऊन मदत केली तर इथे भारतात राहून भरपूर मदत करू शकतात.प्रश्न आहे मानसिकता बदण्याची गरज आहे.लोकसहभाग कसा वाढवायचा याचा महत्वाचा भाग म्हणजे राजकिय साक्षरता आहे.जोपर्यत राजकीय साक्षरता होत नाही.आज ऐंशी टक्क्े साक्षरता असूूनही विचार करता येत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी खंतही तांबे यांनी यावेळी व्यक्त केली. डिजिटल साक्षर होणे नागरिकांची गरज आहे. तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही.यासाठी शाळांपासून सुरूवात करावी लागणार आहे.त्याचप्रमाणे मतदार,पालिकाव्यवस्था,शासन,लो
पुस्तक डिजिटल तंत्रज्ञाचा वापर करून शहरांचा विकास कसा करायचा.लोकसहभाग किती महत्वाचा आहे.शासन,लोकसहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञान यांंचा समन्वय साधून काही प्रश्नांची उत्तरे कसे सापडतील यावर आधारित सिटीझनविल पुस्तक आहे.हे पुस्तक अमेरिकेतील असल्याने तंतोतंत सुचनांचे पालन करु शकत नाही याची कल्पना आहे. प्रश्नाचा दृष्टीकोनाला कल्पना,विचार प्रक्रियेंचे काम पुस्ताच्या माध्यमातून व्हावे ही अपेक्षा आहे