नाशिक : प्रतिनिधी
धनत्रयोदशी पासून दिवाळी सणास प्रारंभ होत आहे. वर्षातील सर्वात मोठा सण असल्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी, गावी जाण्यासाठी लगबग दिसून येते. या कालावधीत प्रवाशांंची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दिवाळी काळात सुट्टीच्या दिवशी देखील पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा : सिटीलिंक बस चालक, वाहकाचा प्रामाणिकपणा
सिटीलिंकच्या वतीने शासकीय सुट्टी, सार्वजनिक सुट्टी (रविवार )च्या दिवशी प्रवासी प्रतिसाद कमी मिळत असल्याने बस फेर्यांमध्ये कपात करण्यात येते. मात्र दिनांक 22 ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत असल्याने सुट्टी असली तरी बसेस पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दिनांक 23 व 30 ऑक्टोबर रोजी रविवार असला तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारच्या दिवशी देखील सर्व बसेस सुरू असतील. तरी प्रवाशांनी या बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : सिटी लिंकच्या ओपन एंडेड पास मध्येच दरवाढ, प्रवास भाडे जैसे थे
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…