सिटी लिंकच्या बसच्या पार्किगमुळे वाहतुकीला अडथळा

सिटी लिंकच्या बसच्या पार्किगमुळे वाहतुकीला अडथळा

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकनाका परिसरात सिटी लिंकच्या बस पार्किग करण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहेत. त्यात बस अर्ध्या रस्त्यात उभ्या असल्याचे चित्र असते परिणामी त्र्यंबककडून येणार्‍या वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
शहराचा मुख्य रस्ता असलेल्या त्र्यंबकनाका परिसराला वाहतुक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. याच परिसरात याठिकाणीच सिव्हील हॉस्पिटल, बसस्थानक, त्र्यंबकेश्वर रोड असल्याने या परिसरात सातत्याने वाहनांची रिघ लागलेली असते. बसस्थानकातून येणार्या बस आणि त्र्यंबकेश्वर रोडवरून येणारी वाहने त्यात ज्या वाहनधारकांना कॉलेलरोडला जाण्यासाठी याच बसस्थानकाच्या रस्त्याचा वापर करत असल्याने तीन रस्त्यांच्या वाहतुकीमुळे या परिसरात मोठी वाहतुक कोंडी होते. या परिसरात रूग्ण वाहिका, सिटी लिंक बस आणि रिक्षा ही वाहने रस्त्यालगत लावलेली असल्याने अर्धा रस्ता त्या वाहनानी व्यापलेला असतो.
परिणामी या परिसरातील पार्किंगसाठी वेगळी जागा करत रस्ता मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली.

रस्ता नाही तर वाहनतळ
त्र्यंबकरोडची अवस्था रस्ता नाही तर वाहनतळ अशी झाली आहे. सिव्हील हॉस्पीटल असल्याने या परिसरात रूग्णावाहिकांची गर्दी असते. तसेच रूग्णांचे नातेवाईक देखिल आपली वाहने तिथेच पार्क करतात. त्याचप्रमाणे सिटी लिंकच्या बसही या परिसरात पार्क करण्यात येत असल्याने हा रस्ता नसुन वाहनतळ असल्याचे चित्र आहे.

अपघातांना निमंत्रण

मुख्य रस्ता असताना वाहतुक कोंडी होत असल्याने त्र्यंबककडून वेगाने येणार्‍या वाहनांना वेगावर नियंत्रण न मिळवता आल्यास अपघात होत आहेत. तसेच या परिसरातील रस्त्यालगत स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने वाळू खडी रस्त्यावर पसरल्यासही अपघात होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *