महाराष्ट्र

सिटी लिंकच्या ओपन एंडेड पास मध्येच दरवाढ, प्रवास भाडे जैसे थे

नाशिक प्रतिनिधी

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक ने भाडेवाढ केल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या असून त्यामुळे प्रवाश्यांमध्ये गैरसमज पसरले आहे.
मात्र अशाप्रकारची कोणतीही सरसकट भाडेवाढ सिटीलिंकने केलेली नाही. सिटीलिंकच्या वतीने केवळ आणि केवळ ओपन एंडेड पासेस मध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे. इतर पासेस किंवा कोणतीही सामान्य भाडेवाढ सिटीलिंकच्या वतीने करण्यात आलेली नाही. असे सिटी लिंक च्या वतीने मिलिंद बड यांनी सांगितले आहे

नाशिक महानगर परीवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची १३ वी बैठक बुधवार दिनांक १४/०९/२०२२ रोजी पार पडली. या बैठकीत सिटीलिंकच्या वतीने देण्यात येणार्‍या ओपन एंडेड पासेसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मात्र ही दरवाढ केवळ आणि केवळ ओपन एंडेड पासेसमध्येच करण्यात आली आहे. विद्यार्थी, रूट पास किंवा सामान्य प्रवासी भाड्यात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
सिटीलिंकच्यावतीने तीन प्रकारचे पास दिले जातात. यामध्ये विद्यार्थी पास, रूट पास व ओपन एंडेड पास. मात्र विद्यार्थी व रूट पास मध्ये कोणतीही दरवाढ न करता केवळ आणि केवळ ओपन एंडेड पासेसमध्ये शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. तसेच प्रवासी भाड्यात देखील कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाश्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. ची स्थापना झाल्यापासून केवळ एकदाच भाडे वाढ करण्यात आलेली होती व सदर भाडेवाढ दिनांक १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात आलेली आहे. मात्र त्यावेळी भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी ओपन एंडेड पासेसच्या केवळ एक दिवसाच्या पास मध्ये दरवाढ करण्यात आलेली होती. ओपेन एंडेड चा १ दिवसाचा पास ७५/- रुपयांवरुन १००/- रुपये करण्यात आलेला होता. व ओपेन एंडेड पासेसच्या इतर दिवसांच्या पासेसमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नव्हती. त्याच उर्वरित दिवसांच्या पासेची दरवाढ आता करण्यात आलेली आहे. नवीन कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.

बुधवार दिनांक १४/०९/२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत देखील केवळ ओपन एंडेड पासेसच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे_

१) १ दिवसाच्या ओपन एंडेड पास शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १ दिवसाच्या पासेस मध्ये १ जानेवारी पासून ७५/- रुपयांवरून १००/- भाडेवाढ करण्यात आलेली होती म्हणून यात नवीन भाडेवाढ करण्यात आलेली नाही.
२) ३ दिवसांच्या ओपन एंडेड पास २००/- रुपयांवरून २५०/- रुपये करण्यात आला आहे.
३) ७ दिवसांचा ओपन एंडेड पास ४००/- रुपयांवरून ५००/- रुपये करण्यात आला आहे.
४) ३० दिवसांचा ओपन एंडेड पास १५००/- रुपयांवरून २०००/- रुपये करण्यात आला आहे
५) ३ महिन्यांचा ओपन एंडेड पास ३७५०/- रुपयांवरून ५०००/- रुपये करण्यात आला आहे.
६) ६ महिन्यांचा ओपन एंडेड पास ६७५०/- रुपयांवरून ९०००/- रुपये करण्यात आला आहे.

सदर शुल्क वाढ ही १ ऑक्टोबरपासून लागू होणार असली तरी केवळ ओपेन एंडेड पास मध्येच ही दरवाढ करण्यात आलेली आहे. याचा कोणताही परिणाम विद्यार्थी, कर्मचारी किंवा सामान्य प्रवासी भाड्यावर होणार नाही. सिटीलिंकचा प्रवास महागणार किंवा सिटीलिंक ने प्रवासी भाड्यात वाढ केली असल्याची गैरसमजूत प्रवाश्यांमध्ये पसरली आहे. परंतु प्रवाश्यांनी देखील खात्री केल्याशिवाय अश्या कोणत्याही गैरसमजूतींना बळी पडू नये व दिशाभूल करून घेऊ नये. सिटीलिंक ही सार्वजनिक वाहतूक सेवा असून यामध्ये सामन्यातील सामान्य प्रवाशाचा विचार करूनच निर्णय घेतले जातात. त्यामुळे सिटीलिंक कोणतीही विनाकारण दरवाढ प्रवाश्यांवर लादणार नाही.

Devyani Sonar

Recent Posts

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

6 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago