नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराची स्वछ शहर सर्वेक्षणात सलग दुसर्या वर्षी घसरण झाली असून नाशिक थेट विसाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. भारतात वीस तर राज्यात पाचव्या क्रमांकावर ही घसरण झाली आहे. नाशिकच्या स्वच्छतेसाठी कोटय़वधींचा खर्च करूनही सातत्याने नाशिकची घसरगुंडी होत असल्याने याप्रकरणी आता तर्कवितर्क लावले जात आहे. स्वच्छ ते साठी येणार्या कोट्यावधी रुपयांचे झाले काय असा सवाल उपस्थित केला जातोय.
मागील वर्षी देशात सतराव्या स्थानी गेल्या नंतर महापालिका जोराने कामाला लागली होती ‘तसेच पाहिल्या टॉप टेन मध्ये क्रमांक पटकावण्याचा निर्धार घनकचरा विभागाने केला होता’ परन्तु हा केवळ पोकळ दावा ठरल्याचे शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे.