नाशिक : प्रतिनिधी
सिटी लिंक बससेवेचे कामकाज नेमके कसे चालते? या विषयी सामान्य प्रवाशांमध्ये कुतुहल असते. मात्र, आता हे कामकाज पाहण्याची संधी सामान्य प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
सिटी लिंक बससेवा नाशिककरांच्या रोजच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग झाला आहे.
एका क्लिकवर तिकीट बुक करणे, ऑनलाइन पासेस काढणे, पासेस अद्ययावत करणे, प्रवास मार्ग आपल्या मोबाइल ऍपवर बघणे, बस कधी येणार, कुठे जाणार, सध्या कुठे आहे, अशी सर्व माहिती एका क्लिकवर प्रवाशांना मिळण्याची सुविधा सिटीलिंकने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सिटी लिंकच्या कामकाजाविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता सिटीलिंकने दर शनिवारी आपली कंट्रोल रूम बघण्याची आणि तेथील कामकाजाची माहिती जाणून घेण्याची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये बसेसचे परिचालन कसे चालते, सिटीलिंक आपल्या बससेवेवर कसे नियंत्रण ठेवते, बसेस कोणत्या थांब्यावर थांबल्यात, बसेसने कोणत्या मार्गावरून किती वाजता फेरी सुरू केली, केव्हा बस फेरी संपली, जीपीएस यंत्रणा कशी कार्य करते अशी सर्व माहिती प्रवाशांना जाणून घेता येणार आहे. दर शनिवारी 11 ते 12 या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर एकावेळी केवळ 10 व्यक्तींनाच या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी जे प्रवासी इच्छुक आहे त्यांना 10 ते 6 या कार्यालयीन वेळेतच 8793999860 या मोबाइल क्रमांकवरून भेटीची तारीख निश्चित करता येईल. शनिवार दि. 4 जूनपासून हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिटीलिंकच्या वतीने देण्यात आली आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…