नाशिक प्रतिनिधी
तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्याने आज सकाळपासून सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले त्यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली. नागरिक व शालेय विद्यार्थी यांना याबाबतची कल्पना नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले अनेक विद्यार्थी अडकून पडले तर अनेकांना महाविद्यालय व क्लासला दांडी मारण्याची वेळ आली बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांचेही हाल झाले नेहमीप्रमाणे रिक्षा चालकांनी प्रवासी भाडे मनमानी पद्धतीने आकारले त्यामुळे नागरिकांना आर्थिक मृदंड सहन करावा लागला सिटी लिंक बस सेवेमध्ये पगाराची अनियमित असल्याने अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दुमसत होता आज सकाळी या संतापाचा उद्रेक होत कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले.