30 सप्टेंबरपर्यंत शोधमोहीम सुरू राहणार
नाशिक : गोरख काळे
नाशिक महानगरपालिकेकडून मंगळवार(दि.13)पासून शहरात क्षयरोग व कृष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत पालिकेने नेमेलेल्या पथकाला 6 रुग्णांना क्षयरोग झाल्याचे तपासणीत समजले आहे. मोहीम सुरू झाल्यापासून 50 हजार 66 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यासाठी 146 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथके 48 हजार 436 घरांना भेटी देऊन 2 लाख 42 हजार लोकसंख्येची तपासणी करणार आहेत. हे पथके घरोघरी जाऊन तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक तपासणी झालेल्या घरावर एल अक्षर, क्रमांक व तारीख नोंदविण्यात येत आहे. सदर मोहिमेस नागरिकांनी सहभागी करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. मोहिमेत रोगाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची मनपाच्या रुग्णालयात मोफत एक्स-रे तपासणी औषधोपचार सुरू करण्यात येत आहे. उपचार सुरू असेपर्यंत या क्षयरुणांना निक्षय पोषण योजनेंतर्गत दरमहा 500 रुपये देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नागरी आरोग्य केंद्रस्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तपासणीत आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…