24 हजार रूपयांची लाच घेताना लिपीक जाळ्यात
नाशिक प्रतिनिधी
आरोग्य उपसंचालकाला मागील महिन्यात लाच घेताना पकडण्याची प्रकरण ताजी असतानाच आज जिल्हा रुग्णालयातील एका लिपिकाला 24 हजार रुपयांची लाच घेताना लाख लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले वैद्यकीय वैद्यकीय बिल पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागितली होती, ताडजोडीअंती 24 हजारांवर सौदा ठरला, याबाबत तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला, लाच घेताना जिल्हा रुग्णालयातील राजेश नेहुलकर या वरिष्ठ लिपिकास रंगेहाथ पकडण्यात आले, ही कारवाई अधीक्षक सुनील कडासाने, अपर अधीक्षक नारायण न्हयालदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हवालदार पंकज पळशीकर प्रभाकर गवळी, नितीन कराड यांनी केली.