नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्यापरीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी(दि.13) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी1 वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. मागच्याच आठवड्यात बारावी चा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा शैक्षणिक धोरणात नवीन बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करण्यात येणार आहेत.