मनमाडचा महावितरण कंपनीचा लिपिक लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
महावितरण कंपनीतील उच्च स्तरीय लिपिक समाधान त्र्यंबक हिवाळे रा. प्लॉट नंबर 15, सारथी अपार्टमेंट,नरहरी नगर, पाथर्डी फाटा नाशिक यास सात हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार आणि त्यांचे तीन मित्र यांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार असे बारा हजार मागितले होते. त्यापैकी पाच हजार तक्रारदार याच्या मित्राने काही दिवसांपूर्वी फोन पे केले होते उर्वरित सात हजार रुपयांसाठी तक्रारदाराकडे संशयित लाचखोर हिवाळे याने तगादा लावला होता त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार काल सापळा रचण्यात आला पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप वनवे संदीप हांडगे सुरेश चव्हाण यांनी रचलेल्या सापळ्यात समाधान हिवाळे हे रंग हात पकडले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अपरधीक्षक माधव रेड्डी उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…