देवळा : पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथे सकल हिंदू समाजातर्फे बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. देवळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शोकसभा घेण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजता शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. निषेध मोर्चात सकल हिंदू समाज, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह काही मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी देवळा पोलिसांना निवेदन देण्यात आले.