मनमाड : आमिन शेख
– मनमाडला कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली असुन आगीचे कारण अस्पष्ट असून या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.मनमाड अग्निशमन दल तसेच स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आले सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा माल मात्र जुळून खाक झाला आहे.
मनमाडला सरदार पटेल रोडवर असलेल्या परिक क्लॉथ स्टोरला सोमवारी रात्री भीषण आग लागली अचानक धुराचे लोट बाहेर आल्याने आग लागल्याचे लक्षात आले स्थानिकांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाला स्थानिक तरुण आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत तीन मजली इमारतीला मोठ्या प्रमाणावर आग पसरली होती अथक प्रयत्न करून ही आग विझविण्यात आली आग विझवण्यासाठी गावातील खासगी पाणी वितरण करणाऱ्या टँकरने देखील मदत केली.या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी दुकानातील लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक दर्शी दिसून येते.
अग्निशमन दल तसेच स्थानिक तरुणांना यश
मनमाडला आग लागली किंवा इतर काही घटना घडली तर अग्निशमन दल तसेच स्थानिक तरुण कायम मदतीला धावून येतात कालची घटना घडली तेव्हा तात्काळ अग्निशमन दल व स्थानिक तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना यात यश आले.आग विझली नसती तर संपूर्ण इमारतीला ती लागली असती.
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…
8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…
दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…
नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…
उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…