मुख्यमंत्री शिंदे नाशकात
नाशिक प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी तथा कळवण प्रांत अधिकारी विकास मीना,सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिक प्रांत अधिकारी वर्षा मीना, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, महानगरपालिकचे उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. पंचवटीतील केवडी बन येथे सुरू असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन झाले मुख्यमंत्र्यांचा हा एकमेव कार्यक्रम असून त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत