युवा महोत्सव तयारीच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री उद्या नाशकात
नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिनांक 8 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे,
ओझर येथील विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे, मुख्यमंत्री ओझर येथून वाहनाने तपोवन येथील मैदानाची पाहणी करणार आहेत. तपोवन येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहेत, संपूर्ण भारतातील सुमारे 7 हजार युवक या महोत्सवात सहभागी होणार आहे, मोदी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. केंद्राचे पथकही या तयारीच्या आढावा घेण्यासाठी येऊन गेले आहेत, युवा महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर असल्याने मुख्यमंत्री स्वतः तयारीचा आढावा घेण्यासाठी आज येत आहेत, सुमारे दोन तासांच्या दौऱ्यात ते संपूर्ण तयारीचा आढावा घेऊन पुन्हा विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत,
मुख्यमंत्री घेणार तयारीचा आढावा
राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरात होणार असुन आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.8)रोजी नाशिक दौर्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय युवा महोत्सव होणार असलेल्या तपोवन मैदानाची पाहणी करणार आहेत.. ते दुपारी 3 वाजता नाशिक शहरात येणार असुन 5:30 ला मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…