वातावरानातील बदलामुळे नागरिक बेहाल
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पहावयास मिळ्त आहे. या बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत असून परिणामी शहरातील रुग्णालये हाउसफूल झाल्याचे दिसते आहे. रात्री कडाक्याची थंडी अन दिवसा कडाक्याचे ऊन अशा दुहेरी वातावरनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आताशी फेब्रुवारी महिना सुरु असतानाच वातावरणाती तापमान दुसऱ्याच आठवडयात 34 अंशावर पोहचल्याचे यातून आगामी उन्हाळयाची चाहूल दिसून येते.
नाशिककरांना गेल्या तीन चार वर्षापासून कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवडयात कडाक्याचे उन पडते आहे. एकीकडे उन तर रात्रीच्या वेळी थंडी या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाची तीव्रता पाहता आगामी मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात उष्तेच्या लाटा येऊ शकतात. या तीन महिन्यात जिल्हा व शहरवासियांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागतो. वातावरणातील बदलत्या लहरीपणामुळे नागरिक दिवसा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पेयाचा आधार घेतात. तसेच तीव्र किरणांपासून संरक्षण व्हावे याकरिता टोपी घालून खबरदारी घेताना दिसत आहे. रात्री थंडीपासून बचाव होण्याकरिता उबदार कपडे घालत आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातच वातावरणात वाढ झाल्याने पुढील तीन महिने तीव्र उन्हाचे राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांना विशेष काळ्जी घ्यावी लागणार आहे शहरात काही दिवसांपूर्वी थंडी गायब झाल्याचे चित्र होते. परंतु उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे वातावरणत पुन्हा थंडी वाढली आहे. फेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यत वातावरण चाळीशी पार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागण्याची शख्यता आहे.
आठवड्यात वातावरणातील किमान, कमाल तापमान
वार- किमान- कमाल
गुरुवार- 11.5 43.7
शुक्रवार- 12.5 34.7
शनिवार- 10.9 33.5
रविवार- 10.2 31.2
सोमवार – 10.9 30.9
मंगळ्वार – 10.7 31.7
बुधवार – 9.6 33.5
…
दिवसभरात तीन चार लिटर पाणी घ्यावे. जेवढे जास्ती पाणी घेतल्यास त्यामुळे कोरडेपणा खाज येणार नाही. नागरिकांनी जास्त पाणी प्यावे, या दिवसात कोरडेपणा वाढत असल्याने शरीरारात पाणी अधिक असणे आवश्यक आहे.मीठ साखरेचे पाणी, लिंबू पाणी, ताक घ्यावे. तसेच यादिवसात मूळ य्याधीचा त्रास काहींना होतो याकरिता दररोज फळांचा वापर अधिक करणे आवश्यक आहे. जेवणात कोरडे अन्न न घेता पालेभाज्या जास्त घ्याव्यात. यासंह जास्त तिकीट खाऊ नयेत. उन्हात जाणे टाळावे.
डॉ. सचिन गायकवाड, यशमाला क्लिनिक, जेलरोड