नाशिक

मखमलाबाद परिसरात 8 हजार 779 गणेशमूर्तींचे संकलन

पंचवटी : प्रतिनिधी
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संकल्प करीत मखमलाबादच्या जिजाई युवा फाउंडेशनने पाटाजवळ राबविलेल्या देव द्या, देवपण घ्या या उपक्रमाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याठिकाणी दिवसभरात तब्बल आठ हजार 779 गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात निर्माल्यही जमा करण्यात आले. दरम्यान, नारायणराव मानकर फाउंडेशन आणि अमृतवन परिवार, श्री एकदंत गणेश प्रतिष्ठानच्या वतीनेदेखील गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या.
मखमलाबादचा वाढता परिसर लक्षात घेता येथील जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक प्रमोद पालवे यांनी स्वखर्चाने मखमलाबाद रोड, पाटाजवळ महादेवबाग, सर्वज्ञ कॉम्प्लेक्ससमोर गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यंदाचे सातवे वर्ष होते. या ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. पावसाची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी मंडपही उभारण्यात आला होता. यावर्षी नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद देत या उपक्रमाचे कौतुक केले.
याठिकाणी दिवसभरात जवळपास आठ हजार 779 गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. यावेळी जिजाई फाउंंडेशनचे संस्थापक प्रमोद पालवे, संजय पिंगळे, श्याम काकड, प्रदीप पिंगळे, विजय शिरसाठ, नाना डांबळे, महेश मानकर, स्वप्नील मानकर, उमाकांत काकड, नितीन काकड, गणेश फडोळ, बापू फडोळ, सचिन पिंगळे, गणेश फडोळ, बापू फडोळ, प्रसाद काकड, गणेश घुगे, अथर्व घुगे, सोहिल पटेल, अली खान, दर्शन पिंगळे, प्रताप पालवे, तसेच मखमलाबाद परिसरातील भाविक व जिजाई युवा फाउंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.0

अमृतवन परिवार

अमृतवन परिवार व श्री एकदंत गणेश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीनगर परिसरात गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी दोन हजारच्या आसपास मूर्ती संकलित करण्यात आल्या. याप्रसंगी ज्ञानेश्वर काकड, संजय बोराडे, श्रावण सूर्यवंशी, अंबादास शेलार, जयश्री गावित, एकनाथ दिघे, नरेंद्र जाधव, शेखर शिंदे, सुभाष श्रीवास्तव, देवीदास पवार आदी उपस्थित होते.

दहा हजार कापडी पिशव्या वाटप

प्लास्टिक वापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. प्लास्टिकचे विघटन न झाल्यामुळे ते भूमी व जलप्रदूषण करते. प्लास्टिकमधून बाहेर पडणारी रसायने हार्मोन्समध्ये बदल घडवतात, ज्यामुळे पुनरुत्पादक समस्या आणि कर्करोग होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, जिजाई फाउंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पालवे यांनी स्वखर्चाने मूर्तिदान करणारे व परिसरातील नागरिकांना जवळपास दहा हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहनदेखील केले.

नारायणराव मानकर फाउंंडेशन

मानकर मळा, गुलमोहर अपार्टमेंटजवळ नारायणराव मानकर फाउंडेशनच्या वतीने गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. यावेळी तीन हजार 500 मूर्ती संकलित केल्या. निर्माल्यही संकलित करण्यात येऊन ते मनपाकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक दामोदर मानकर, नारायणराव मानकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मानकर, ऋषिकेश मानकर, सागर मानकर, वेदांत मानकर, हेमंत सांगळे, स्वप्नील मानकर, ललित गायकवाड, जगदीश बोडके, ऋषिकेश काकड, मुन्ना जाधव, अमर बदादे, पप्पू खोडे, सनी मानकर, मयूर राख, अभिजीत घुगे, आदित्य मांडवे, महेश भोई व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago