283 गुन्हेगारांची तपासणी; दोन व्यक्ती घातक शस्त्रांसह ताब्यात
सिडको : विशेष प्रतिनिधी
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार बुधवारी ( दि. 4 जून) सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नाशिक शहर परिमंडळ-2 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
हे विशेष कोम्बिंग ऑपरेशन पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-2) मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार केले. सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख व नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी प्रभारी अधिकारी व अंमलदारांशी समन्वय साधून करण्यात आले.
सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 184 गुन्हेगार तपासण्यात आले. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी करण्यात आली. तडीपार असलेल्या 63 गुन्हेगारांची खातरजमा करण्यात आली. मात्र, हे गुन्हेगार मिळून आले नाहीत. उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विकी शांताराम जावर व अमीर मुराद तांबोळी या दोन इसमांकडून कोयत्यासारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 121 टवाळखोर इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112/117 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असलेल्या व गोवंशाशी संबंधित गुन्ह्यांतील एकूण 35 रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. परंतु, ते मिळून आले नाहीत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी आदी कारवाया भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…