मुलाखत : देवयानी सोनार
लाच देणे- घेणे चुकीचेच आहे. लोकांची मानसिकता किरकोळ चिरीमिरी देऊन काम होतेय ना. त्याशिवाय लाचलुचपत विभागाकडे गेल्यास पुन्हा त्रास होईल की काय, असाही गैरसमज असल्याने लोक तक्रार करण्यास धजावत नाही. लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यामुळे कोणी लाच मागत असेल तर बिनधास्त तक्रारी करा, टोल फ्री क्रमांक (1064) दिलेला आहे. त्यावरही तक्रार करू शकता. तक्रारदाराला आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसेल तर आम्ही त्याच्यापर्यंत पोहचतो.त्याशिवाय थेट आमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता. तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवली जाते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी गांवकरीशी बोलताना सांगितले.
तुमचे शिक्षण कुठे झाले?
जन्म आणि गॅ्रज्युएशनपर्यंत शिक्षण सांगली, पोस्ट गॅ्रज्युएशन पुणे
या क्षेत्रात येण्याचे कारण?
लोकांच्या आयुष्यात बदल करण्याची क्षमता असल्याने खाकीचे पहिल्यापासून आकर्षण होते.
आतापर्यंतचा नोकरीतील प्रवास?
पुणे, उस्मानाबाद, सोेलापूर, सांगली, नाशिक ग्रामीणला अतिरिक्त पोलिस अधीक्षक, राज्य गुप्त वार्ता येथे उपायुक्त आणि नोव्हेंबरपासून लाचलुचपत विभागात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. लाललुचपत विभागात अल्पावधीत अनेक कारवाईद्वारे लाचखोरांवर जरब बसविला आहे.
हेही वाचा : वीस लाखांची लाच घेताना तालुका सहाय्यक निबंधक जाळ्यात
तुमची दिनचर्या कशी असते?
फिक्स असे काहीच नसते. कधी सकाळी सातलाही हजर राहावे लागते. बाहेरच्या परिस्थितीनुसार आमची दिनचर्या बदलते.
कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?
आई-वडील, भाऊ आणि मी. वडील सांगली मनपामध्ये होते. आई गृहिणी, लहान भाऊ बिल्डिंग व्यवसायात आहे. लग्नानंतर सांगलीतच सासर आहे. सासू-सासरे, दोन दीर आणि मिस्टर इंजिनिअर आहेत. लेखक म्हणून कादंबरी, समीक्षक, अनुवादक म्हणून सुपरिचित आहे. मुलगा दहावीला आहे. त्याचे शिक्षण बदलीच्या ठिकाणी कधी सोबत तर कधी आजी -आजोबांसोबत राहून केले.
स्वत:ला फिट कसे ठेवता?
सकाळी व्यायामाला वेळ देते. मेडिटेशन करते. चांगल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारते. चांगले वाचते, व्हिडिओज पाहते.
कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता?
कुटुंबातील प्रत्येकाकडून एक एक गुण घेण्यासारखा आहे. विशेषतः आईकडून संयमीपणा घ्यावा वाटतो. कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहण्याचा गुण आवडतो. वडिलांकडून धाडस तसेच पतीकडून चौफेर विचार करण्याची सवय.
हेही वाचा: अभिनयात करिअर करा; पण शिक्षणाकडे दुर्लक्ष नको!
ताणतणाव कसा हाताळतात?
ताणतणावाचा सामना होतो. तेवढ्यापुरता ताण असतो. पुढच्या दहा मिनिटात सावरले जाते. घरच्यांचा पाठिंबा असल्याने ताणतणाव फारसा जाणवत नाही.
काय वाचायला आवडते?
वृत्तपत्र, कथा, कादंबरी. त्यातही आवडते पुस्तक बाकी शून्य.
आयुष्यातील एखादा चांगला अनुभव
जे हवे ते मिळाले. माझी निवड या क्षेत्रासाठी झाली, याचा आनंद मोठा आहे. लोकांसाठी जे चांगले आहे ते करण्याची इच्छा आहे.
आयुष्यातील कटु प्रसंग
वैयक्तिक बाबतीत कटु प्रसंग नाही. परंतु या क्षेत्रात एवढे वाईट प्रसंग पाहण्यात येतात, की त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
आवडत्या छंदाला वेळ कसा देतात?
स्वयंपाक करायला, वेगवेगळे प्रयोग करायला, प्रवास तसेच हिल्सवर जायला आवडते.
आवडते फूड
साधे जेवण वरणभात.
आवडता रंग
लेमन आणि व्हायलेट रंग आवडतो.
आवडता स्वभाव
सरळ स्पष्ट वागणारे, बोलणारे लोक आवडतात. आत एक बाहेर एक असे नाही आवडत. जे आहात तसेच व्यक्त व्हा. कोणीच परफेक्ट नसतात.
नाशिकबद्दल काय सांगाल?
गेल्या चार वर्षांपासून येथे आहे. इथले रस्ते, निसर्ग वातावरण खूप छान आहे.कनेक्टिव्हिटी चांगली आहे. वातावरण चांगले असल्याने मुंबई, पुण्यातील लोक येऊन राहतात. प्रशासनातील अधिकार्यांनी त्यांची कामे करताना त्यांना सहकार्य केले तर तेही सौंदर्य वाढेल. विकासावर बोलणार नाही, परंतु प्रशासनाने लोकांना सहकार्य करावे जे निसर्गानेसौंदर्य दिले आहे. त्यात आपल्या वागणुकीने भर पाडावी.
पेहरावाबाबत
युनिफॉर्म आवडतोच, युनिफॉर्म शिवायपर्याय नसतो. वातावरणाला सूट होतील असे कपडे आवडतात. केवळ फॅशन आहे म्हणून कपडे घालावे असे नाही तर मला आवडणारे खूप ब्रँडेडही घेत नाही आणि अगदीच हलकेही घेत नाही. कॉटन जास्त आवडते. सणावाराला साडी घालायला आवडते, परंतु वेळ मिळत नाही.
जगात स्थिर काहीच नाही.सर्व अशाश्वत आहे. माझे मला मी या कशाला अर्थ नाही. क्षणात होत्याचे नव्हते होते. त्यामुळे आजचा क्षण दिवस खूप छान जगले पाहिजे. माणूस म्हणून आपणही जगले पाहिले आणि दुसर्यालाही तशी वागणूक दिली पाहिजे. पद,प्रतिष्ठा यासोबत जो डामडौल घेऊन मिरवत असतो तो त्या पदासोबतच जाते. त्यामुळे या गोष्टीची जाणीव कायम असावी. माणसे जपावे. जे कायम आपल्या सुख दुःखात सोबतीला असतील, अशा आपल्या माणसांना जपले पाहिजे.